कळसगादे येथे वाघाकडून बकरी फस्त

चंदगड : कळसगादे ता. चंदगड येथे मोतीराम तुकाराम दळवी या शेतकऱ्याची दोन बकरी वाघाने खाऊन फस्त केल्याची घटना घडली आहे.
हि घटना सोमवारी घडली असून वाघाच्या भीतीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दळवी हे बकरी चारायल्या गेले असता चरण्याच्या नादात बकरी पुढे गेली.दबा धरून बसलेल्या वाघाने एक बकरी फस्त केल्याचे दळवी यांच्या उशिरा लक्षात आले. तर दुसरी बकरी अद्याप सापडली नसल्याने ती हि वाघाने फस्त केल्याचे दळवी यांनी सांगितले.
हि घटना वनविभागाला मिळताच वनपाल एस जी नागवेकर, वनरक्षक अलका लोखंडे, सागर पाटील यांनी येऊन घटनास्थळी भेट दिली.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube