अपघातात जखमी झालेल्या कोवाडच्या शुभम कुट्रेचा मृत्यू

चंदगड :
कोवाड (ता. चंदगड) येथील शुभम शिवाजी कुट्रे (वय २८) याचा तेऊरवाडी जवळ २० नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार ८नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की शुभम हा एका अमेरिकन मेडिकल कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम असे
काम करत होता. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कंपनीच्या कामासाठी नेसरी येथे गेला होता. रात्री दहा वाजन्याच्या दरम्यान घरी परतत असताना हडलगे ते तेउरवाडी या मार्गावर तेउरवाडी जवळील वळणाजवळ त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये तो जखमी झाला होता.यानंतर त्याला गडहिंग्लज येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. शुभमच्या प्रकृर्तीत सुधारणा होतं नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे उपचार सुरू होते.
यादरम्यान उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा रविवारी दि. ८ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
यां घटनेने कोवाड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube