चंदगड :
ढोलगरवाडी फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात माणगाव येथील युवक सचिन बाबुराव राऊत (वय ३८)याचा गाडीवरून पडून जागीच ठार झाला.
याबाबत गजानन राऊत यांनी संजय जोतिबा राऊत याच्या विरोधात चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संजय व सचिन हे दोघेजण कामानिमित्त दुचाकी वरून चालले असता ढोलगरवाडी फाट्या नजीक कलमेश्वर राईस मिल नजीक आले असता अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकीचा ताबा सुटल्याने पाठीमागे बसलेल्या सचिन राऊत याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत संजय राऊत याच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.