ऑनलाईन खरेदी करताना काळजी घ्या -हेमंत कामत

चंदगड तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा
चंदगड /प्रतिनिधी
सध्या डिजिटल युग आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना जागरूक रहा. ग्राहक कायदा, तरतूद समजून घ्या मालाची खरेदी करताना खात्री करा असे प्रतिपादन नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी केले. ते चंदगड येथे आयोजित ग्राहक दिन कार्यक्रमात बोलत होते.प्रास्ताविक पुरवठा अधिकारी प्रकाश जोशीलकर यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील,मारुती पाटील, अर्जुन गावडे उपस्थित होते.
यावेळी संदीप पाटील म्हणाले अखिल भारतीय ग्राहक पंचायत हि राज्यभर ग्राहक जागृतीचे काम करते ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे काम करते त्यामुळे हि चळवळ मोठी करण्यासाठी सुशिक्षित तरुण, सामाजिक कार्यकर्त्यांनी या संघटनेत सामील व्हावे असे अहवाहन केले.तर ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष मारुती पाटील यांनी ग्राहक कायदा व ग्राहकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले.ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुका अध्यक्ष अर्जुन गावडे यांनी होणाऱ्या तक्रारिबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी रास्त भाव दुकानदार अध्यक्ष अंकुश गावडे, विलास कागनकर, अमित पेडणेकर,प्रा. व्ही. टी. पाटील, निंगाप्पा बोकडे, रवी गावडे, ⁠नामदेव गावडे, ⁠विठ्ठल गोगटे, भास्कर करजगी, ⁠शिवाजी नाईक वरगाव, ⁠बाळू कोदाळकर, गणपत बिरजे, ⁠रघुनाथ पाटील, दिलीप भेकणे, ⁠दयानंद जोतगोंडे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन जयवंत पेडणेकर यांनी केले आभार रवी गावडे यांनी मानले.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube