कार्वे येथे नुतन आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार
चंदगड : माझा विजय हा संघर्ष राज्यात वेगळा आहे. कारण अपक्ष असताना हि पंचवीस हजार मताधिक्याने मला जनतेने निवडून दिले
विधानसभेला बलाढ्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असताना जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला आमदार केलं त्यामुळे आता मी
आमदार नाही
माझी जनताच आमदार आहे.असे मत चंदगड विधानसभेचे नुतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. ते कार्वे येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील होते. प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यांनी केले.
पाटील पुढे म्हणाले
या यशामध्ये आजी माजी सैनिक, महिला, तरुण सर्व कार्यकर्ते तसेच विविध पक्षांच्या कार्यक्रत्यांचे मोठे योगदान आहे.
पैशाने निवडनुका जिकता येतात पण मला घराणेशाहीला कंटाळून जनतेने मतदार संघाची जबाबदारी दिली असल्याचे सांगितले .
यावेळी भरमुआण्णा पाटील म्हणाले ९५च्या निवडणुकी नंतर दुसऱ्यांदा गुलाल पडला. गेली साठ वर्ष मी राजकारण करतो
यां तालुक्याच्या नसानसात भरमुआण्णा आसल्याचे सांगितले.
यावेळी ज्योतीताई पाटील, सचिन बल्लाळ,निवृत्ती हरकारे, मोहन चव्हाण, हरिभाऊ पाटील,सह्याद्री देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दीपकदादा पाटील,शांताराम पाटील,मोहन परब,जयवंत चांदेकर,बबन देसाई,मनीषा शिवणगेकर,विठाबाई मुरकुटे,पुनम पाटील अमित वर्पे,जाणबा चव्हाण, गणपत पवार, राजू बोकडे,रमेश पाटील तानाजी कागणकर, संदीप पाटील, निस्सार शेख,अमर नाईक, सुरेश आपके, शरद पाटील, अश्विन पाटील,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केले आभार अशोक कदम यांनी मानले.
युती धर्म पाळणारे वाऱ्यावर
पण आता राजकारण संपलं आता समाजकारण करणार आणि जनतेची सेवा करून मतदार संघाचा कायापालट करणार.
युती धर्म पाळणारे आता वाऱ्यावर आहेत. ज्यांनी माझ्यावर टीका केली. पण सत्ता काळात कुणी नोकरीसाठी पैसे घेतले, कुणी ठेके घेतले याचे पुरावे माज्याकडे अर्जासह आहेत असे सांगताच सभागृहात चुळबुळ सुरु झाली.