बी.एन. पाटील यांना दिनकर मास्तर सर्जनशील शिक्षक पुरस्कार

चंदगड :
तुर्केवाडी ता. चंदगड येथील जनता विद्यालयचे मराठी विषयाचे अध्यापक बी. एन. पाटील यांना डि. के. शिंदे शिक्षण शास्त्र महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या वतीने देण्यात येणारा दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. विद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल व त्यांच्या विविध साहित्यिक उपक्रमांची, चळवळीची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिवाजी रायकर यांनी केले. अध्यक्षस्थानी उर्मिलादेवी श्रीपतराव शिंदे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सायबर महाविद्यालयाचे प्रेसिडेंट .डॉ.रणजीतसिंह शिंदे . सुभाष धुमे उपस्थित होते.
बी.एन.पाटील यांनी आपण राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आपल्याला मिळालेल्या या पुरस्कारात आपल्या सर्व सहकाऱ्यांचा देखील महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले.
यावेळी तानाजी चौगुले, श्रीमती क्रांती शिवणे उपस्थित होते.सूत्रसंचालन पटेल मॅडम यांनी केले तर आभार क्रांती शिवणे यांनी मानले.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube