अडकूर येथे गवीरेड्याच्या हल्यात मजूर ठार

चंदगड :
अडकूर ता. चंदगड, येथे गवीरेड्याच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. यत्त्वाप्पा मल्लाप्पा गुड्डाकाई ( वय ५० ) रा. बोळशनट्टी, ता हुक्केरी, जि. बेळगाव (सध्या रा. अडकूर, ता. चंदगड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
या बाबतची वर्दी मारुती यलाप्पा सनदी, (वय ३०) (रा. बोळशनही, ता. हुक्केरी, जि. बेळगाव. सध्या रा. अडकूर, ता. चंदगड) याने चंदगड पोलिसात दिली आहे.

याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वरील वेळी यातील मयत हा अडकूर गावाचे हद्दीत सदानंद देसाई यांच्या गावठाण नावाचे शेतात मारुती याच्यासोबत भाताचे गवत जमा करण्यासाठी गेला होता. सकाळी दहा वाजता शेताला लागून असलेल्या ओढा काठावर प्राथ:विधीसाठी गेला असता त्याला तेथे असलेल्या गवा रेड्याने मारून जखमी केले. यावेळी त्याच्या डोकीस, डावा हात, खांदा याला मार लागला. कानातून रक्त येऊन रक्तबंबळ झाला. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. पुढील तपास पोहेकॉ देसाई करत आहेत.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube