तेऊरवाडीच्या शेतकऱ्याचा निट्टूर तलावात बुडून मृत्यू

चंदगड :
तलावातील मोटरच पंपाच्या केबलची दिशा बदलण्यासाठी तलावात उतरलेल्या शेतकऱ्याचा निट्टूर येथील तलावात बुडून मृत्यू झाला.
अशोक लक्ष्मण चव्हाण (वय ६०) रा तेऊरवाडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हि घटना शुक्रवारी दुपारी घडली.याबाबत संतोष पुंडलिक पाटील यांनी चंदगड पोलिसात वर्दी दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अशोक चव्हाण हे निट्टूर येथील तलाव क्रमांक २ जवळ असणाऱ्या आपल्या शेताला पाणी देण्यासाठी गेले होते.तलावात किती पाणी आहे हे पाहण्यासाठी आणि केबलची दिशा बदलण्यासाठी उतरलेल्या चव्हाण यांच्या हातातील दोरी सुटल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत पो. नि. विश्वास पाटील यांच्या आदेशाने पो.हे.काँ. जमीर मकानदार अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube