चंदगड /प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी ता चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिवनगे ता चंदगड येथे मंगळवार दि ७ जानेवारी ते सोमवार दि १३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरासाठी संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक प्रशासकीय वर्ग आजी-माजी विद्यार्थी शिवणगे ग्रामस्थ विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी डी अजळकर तसेच प्रकल्प अधिकारी प्रा यु एस पाटील प्रा आर व्ही पाडवी प्रा. शाहू गावडे प्रा अंकुश नौकूडकर आदींनी केले आहे.
मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ११. ३० वा संपन्न होईल या प्रसंगी उद्घाटक म्हणून चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचालक तानाजी चौगुले हे उपस्थित राहणार आहे तर अध्यक्षस्थानी दौलत उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव जाधव आहेत.
कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील , व्यवस्थापक मनोहर होसुरकर शिवणगे सरपंच संतोष शिवणगेकर उपसरपंच सौ सुमन सांबरेकर, विशाल पाटील, गोविंद पाटील,आप्पाजी पाटील,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. चंद्रकांत पोतदार, नंदकिशोर गावडे, शीतल पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.