चंदगड :
बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, साड्या, सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ९६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी कानडी येथे लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
कानडी येथील चंद्रकांत देसाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून गुरुवारी रात्री चोरट्यांनी सोन्याची चेन, कर्णफुले-दोन मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख २१ हजार असा एकूण ८१ हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच शेवंता कांबळे यांच्या ट्रंकमधील २ हजार किमतीच्या १० साड्या, रोख १० हजार व कृष्णा कांबळे यांचे ६ तोळ्याचे चांदीचे दागिने असा एकूण ९६ हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक करत आहेत.