चंदगड : शहाजी लॉ कॉलेज दुसऱ्या वर्षामधील सुयश पाटील याने शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय शुटींग स्पर्धेत ५० मीटर फ्री पिस्टल प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून यामुळे त्याची पंजाब युनिव्हर्सिटी मोहोली येथे दि. ८ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान होणा-या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. यू. एस. पाटील यांचे ते सुपुत्र असून संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. अमित बाडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. एन. सी. शेख, मोकाटे या सर्वांनी प्रोत्साहन देऊन त्याचे अभिनंदन केले.