सामाजिक कार्यकर्ते विलास पाटीलयांचे प्रतिपादन, पाटणे फाटा येथे पत्रकारदिन साजरा
चंदगड /प्रतिनिधी
समाज्यातील दुर्लक्षीत घटकांना न्याय देऊन त्यांचे प्रश्न, समस्या जनतेसमोर मांडण्याचे प्रयत्न पत्रकार करत असतात. धावपळीच्या युगात संसार, प्रपंच्याकडे दुर्लक्ष करून केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून सामाज्यात न्यायदानाचे काम पत्रकार करत असतात. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी केले.
ते पाटणे फाटा येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
प्रास्ताविक सुनील कोंडूसकर यांनी करुन पत्रकारांच्या समस्या मांडल्या.
यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अथर्व- दौलतचे एच. आर. अश्रू लाड म्हणाले पत्रकार समाज्याच्या पत्रकारांच्या व्यथा मांडतो पण त्याच्या व्यथा मांडायला त्याला स्वातंत्र्य नाही. ही बाब खेदजनकआसल्याचे सांगितले. तर पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी ऐकून घेऊन पत्रकारांना ठोस योजनांच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे असे मत दयानंद देवाण यांनी व्यक्त केले.तर पत्रकार हा समाज व शासन यातील दुआ असून पत्रकारांची लेखणीतुन समाज्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम पत्रकार करत असतात असे मत प्रा. विलास नाईक यांनी व्यक्त केले.यावेळी विठ्ठल सुतार, संदीप चव्हाण यांनी हि शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक असोसिएशनचा चंदगड तालुका पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय कुट्रे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नारायण गडकरी,विलास कागणकर, लक्ष्मण व्हण्याळकर, संतोष सुतार, महेश बसापुरे, शहानूर मुल्ला, प्रकाश ऐनापुरे, बाबासाहेब मुल्ला,तातोबा गावडा, विजयकुमार कांबळे, रुपेश मऱ्यापगोळ आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन निंगाप्पा बोकडे यांनी केले आभार अशोक पाटील यांनी मानले.