कोवाड येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडले

१८लाख ७७हजार लंपास

चंदगड :

कोवाड ता. चंदगड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम अज्ञातांनी फोडून १८लाख ७७हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.याबाबत आशिष रोकडे सुंदर नगर नेसरी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कोवाड येथील निट्टूर रोडवर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेच्या खालती बँकेचे एटीएम आहे.ते शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यानी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील पैसे काढतांना बँकेच्या ऑनलाईन ई सर्व्हिस सेंटरला माहिती मिळाली यावरून नेसरी व कोवाड पोलीस नाक्यात माहिती देण्यात आली. यावरून नेसरी येथे पोलिसांनी चोरट्याना पकडण्यासाठी रस्ता रोकण्याचा प्रयत्न केला होता पण चोरट्यानी बॅरिकेट उडवून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला. पण हेब्बाळ -जलद्याळच्या रोडवर आपली एम. एच. ०९ई. बी. ९९१८गाडी ठेऊन पलायन केले.
यां घटनेची माहिती मिळताच कोवाड येथे रविवारी सकाळी बँक आवारात बघ्यानी गर्दी केली होती.यां घटनेने चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून गडहिंग्लज विभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व चंदगड पो.नि. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि. ए. एस. डोंबे करत आहेत.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube