चंदगड मतदार संघाला विकासाचे तोरण बांधू- मंत्री आबिटकर

सावर्डे येथे मंत्री आबिटकर यांचा सत्कार
चंदगड /प्रतिनिधी
आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून चंदगड मतदार संघाला धोरणत्मक व कार्यकुशल आमदार लाभला आहे. त्यांचे वरिष्ठ पातळीवरील संबंध आणि चंदगडच्या विकासासाठी माझी साथ मिळून चंदगड मतदार संघाला विकासाचे तोरण बांधू असा विश्वास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
ते सावर्डे येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल शिवनगेकर यांनी केले.
आबिटकर पुढे म्हणाले
देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या सैनिकांचे नैतिक अधिष्ठान शिवाजीराव पाटलांना लाभून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. चंदगड तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी शिवाजीरावांना मनापासून साथ देणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडीक म्हणाले, शिवाजीराव पाटील हे राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करणारे व्यक्तिमत्व असून जिल्ह्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे चंदगडच्या विकासात आता अडचण येणार नाही. शिवाजीराव पाटील म्हणजे सैनिकांचा आमदार असून भरमूअण्णांच्या साक्षीने प्रत्येक गाव आणि गल्ली मला परिचित असून निसर्गाने नटलेल्या पर्यावरण पुरक तालुक्यावर आपले विशेष प्रेम आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, उद्योग याचा मास्टर प्लॅन करा, त्याला आमची साथ असेल असे मत व्यक्त केले.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यात आरोग्याच्या सुविधा कार्यक्षम करण्याबरोबरच एम.बी.बी.एस. कॉलेज, नर्सिंग कॉलेजसह, महिलांना स्वतंत्र हॉस्पिटल यासाठी आरोग्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच बोलण्यापेक्षा करून दाखविण्याचा माझा मानस आहे. लोकांना कामांची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, अशोक चराटी, नाथाजी पाटील, सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, लक्ष्मणराव गावडे, मायाप्पा पाटील, संतोष तेली, अनिरूध्द केसरकर, जयवंत चांदेकर, उदयसिंग सरदेसाई, केरबा पाटील, अॅड. हेमंत कोलेकर, डॉ. गंगाधर व्हसकोटी, गिरिजादेवी शिंदे, ज्योती पाटील, दीपक पाटील,रवी बांदिवडेकर,अशोक कदम आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सह्याद्री देसाई यांनी केले.आभार ऍड. विजय कडुकर यांनी मानले.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube