मतदार संघाचा विकास करण्याची धमक शिवाजी पाटलांकडे -अनिरुद्ध रेडेकर

शिवसेना शिंदे गटाचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा

चंदगड /प्रतिनिधी :
चंदगड मतदार संघाचा विकास व्हायचा असेल तर शिवाजीराव पाटील यांच्यासारखा दूरदृष्टीचा नेता हवा. मतदार संघाचा खुटलेला विकास लक्षात घेऊन आणि मतदार संघाचा विकास करण्याची धमक केवळ शिवाजीराव पाटील यांच्यात असल्याने आम्ही यांना पाठिंबा देत असल्याचे मत अनिरुद्ध रेडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सावर्डे येथे शिवाजीराव पाटील यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केला.
रेडेकर पुढे म्हणाले शिवाजीराव यांचे वरिष्ठ पातळीवरील संबंध आणि मतदार संघाच्या विकासासाठी असलेली तळमळ हि ईतर नेत्यांच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे या मतदार संघाला पाटील यांची गरज आहे.
यावेळी शिवाजी पाटील म्हणाले विकासाची दूरदृष्टी असलेल्या कै. केदारी रेडेकर यांचे सुपुत्र व एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांचा पाठिंबा हा माझ्या विजयाचा शिल्पकार असेल. पुढील काळात अनिरुद्ध रेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठे हि अडचण येणार नाही. आजरा तालुक्याच्या विकासात कमी पडणार नाही अशी ग्वाही शिवाजीराव पाटील यांनी दिली.
यावेळी मल्हार शिंदे, चाळोबा देसाई, शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख मारुती नावलगी , बाबू नेसरीकर यांचासह सर्व कार्यकर्तें उपस्थित होते.

 

You cannot copy content of this page

Facebook
YouTube