चंदगड :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे दि. ४ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या
विभागीय शासकीय शालेय मॉडर्न पेंठ्याथलॉन स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात कु. जान्हवी पांडुरंग मोहणगेकर इयत्ता 9 वी हिने द्वितीय क्रमांक पटकवाला आहे आणि १७ वर्षे वयोगट स्पर्धेत कु. मोहन वैजू पाटील याने तृतीय क्रमांक पटकवाला आहे. या दोघांची १० ते १२ जानेवारी रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मॉडर्न पेंठ्याथलॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव आणि सर्व संचालक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण मंडळ किणी
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक यांचे प्रोत्साहन लाभले.