रामपूर येथे नवरात्री निमित्त व्याख्यान
चंदगड /प्रतिनिधी
एक आण्याचा हि भ्रष्टाचार न करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या बॅनरवर दिसतात. पण त्यांचे विचार आणि त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेऊन समाज्यासाठी आपले समर्पण करणारा नेता कुणाला होता आलं नाही.
महाराज्यांच्या नावाने जयघोष करत मिरवणारे शिवभक्त खूप आहेत.शिवभक्त म्हणून मिरवत असाल तर शिवारायांचे विचार हि आत्मसात करा.असे प्रतिपादन शिव व्याख्याते रजत हुलजी यांनी व्यक्त केले. ते रामपूर ता. चंदगड येथे नवरात्री निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.प्रास्ताविक धैर्यशील यादव यांनी केले.
हुलजी पुढे म्हणाले स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाला मोघलंच्या ओलीस ठेवणारे राजे यांना कधी स्वार्थ दिसला नाही.त्यामुळेच त्यांनी वाहत्या पाण्यात दुर्ग बांधले. स्वराज्यासाठी प्राण द्यायला तयार होणारे मावळे तयार केले सरसेनापती गुज्जर, तानाजी मालुसरे, हिरोजी इंदुलकर,शिवा काशीद, येसाजी कंक सारखे निष्ठावंत सहकारी निर्माण केले. त्यामुळेच तीन पिढ्यापासून लादलेलं मुघल साम्राज्य निस्तनांबुत करू शकले. ज्यावेळी प्रत्येकाच्या घरात जिजावू दिसेल तेव्हाचं प्रत्येकाच्या अंगणात शिवाजी खेळतांना दिसेल. हि टाकत फक्त महिलांच्यात आहे. शिवाजी नाचून नाही वाचून आत्मसात करा.असे अहवान हि हुलजी यांनी यावेळी केले.
यावेळी विश्वजीत गावडे
सागर वर्पे
रतन देवन
सूरज यादव
श्रेयस गावडे
विशाल तुर्केवाडकर
स्वप्नील साळुंखे
सूरज देवाण
कृष्णा सुतार
परशराम शिवनगेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन, आभार प्रा. विलास नाईक यांनी मानले.