चंदगड /प्रतिनिधी
नवरात्री निमित्त हलकर्णी ता. चंदगड येथील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ व महागाव येथील संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल व वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, ई.सी. जी. तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.तरी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अहवान दुर्गामाता मंडळातर्फे करण्यात आले आहे.