चंदगड /प्रतिनिधी
हलकर्णी फाटा येथे कल्याण, मुंबई जुगार घेताना सोमवारी सायंकाळी हलकर्णी येथील अरविंद विष्णु पांढरफळे याला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य बुक्की मालक संजय नाईक रा. हलकर्णी हा पसार झाला. यामध्ये २३३२० रुपये व जुगार साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याबाबत पो. हे. कॉ. दीपक घोरपडे यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दिली आहे.तर पो. हे. कॉ. प्रकाश पाटील,दीपक घोरपडे,राजेंद्र वरंडेकर यांनी हि कारवाई केली आहे.