चंदगड /प्रतिनिधी
बेळगावसह कर्नाटक राज्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था म्हणून एसकेई संस्था ओळखली जाते. चंदगड तालुक्यातील विध्यार्थ्यांची गरज ओळखून
साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीचे बीसीए महाविद्यालय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून पासून सुरू होतं आहे. अत्याधुनिक सुविधांसह विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून संस्थेने आतापर्यंत प्रगती केली आहे.चंदगड परिसरात संगणक क्षेत्रातील उच्च शिक्षणाची सोय झाल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कंपन्यांना योग्य व कुशल मनुष्यबळ मिळत नाही. ते पुरवण्याचे काम संस्था करेल असा विश्वास संस्थेने दाखवला आहे. संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रात दीर्घ वर्षांचा असणारा अनुभव चंदगड भागात विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा ठरेल. या संस्थेत शिकणारे विद्यार्थी आज वैज्ञानिक, संरक्षण खाते, शासकीय निमशासकीय, उद्योग, शैक्षणिक आदि क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत. अनेक सामाजिक चळवळी या संस्थेत उभ्या राहिल्या. त्यामुळे चंदगड भागात या संस्थेचे महाविद्यालय चंदगडसाठी खूप फलदायी ठरेल असा विश्वास आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची संलग्नता प्राप्त झालेली आहे. प्रशस्त लॅब, आधुनिक सुविधानियुक्त वर्ग, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध आहे. सद्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष चौगले यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, अशोक शानभाग, सचिव मधुकर सामंत , ज्ञानेश कलघटगी, खजिनदार श्रीनाथ देशपांडे, संदीप तेंडूलकर एसकेई संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, एस. एन देसाई, संतोष चौगुले, तसेच सरिता पाटील, स्वेता दळवी, विजयकुमार पाटील, संदीप देशपांडे,प्रा. जीवन बोडस,विजयकुमार दळवी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.