चंदगड /प्रतिनिधी
मजरे कार्वे ता. चंदगड येथे वडील दारू पीत असल्याच्या नैराश्येतुन प्रयास पांडुरंग पाटील (वय १७)मुळ गाव किटवाड सध्या रा.मजरे कार्वे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना रविवारी घडली याबाबत राजेंद्र निंगाप्पा इंजल यांनी चंदगड पोलिसात वर्दी दिली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की प्रयास याने वडील पांडुरंग दररोज दारू पिऊन घरात गोंधळ घालतात त्याच नैराश्येतुन त्याने घरातील हॉल मध्ये छताच्या हुक्काला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.सोमवारी सकाळी दहा वाजता किटवाड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अधिक तपास पो. हे. कॉन्स्टेबल अमोल पाटील करत आहेत. या घटनेने कार्वेसह किटवाड परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होतं आहे.