शिनोळीत जुगार अड्ड्यावर छापा

पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त,५८ जणांवर गुन्हा दाखल

चंदगड : चोरीछुपे सुरु असलेल्या शिनोळी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून शुक्रवारी रात्री रोख रकमेसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कोल्हापूर विभागाने जप्त केला तर जुगार खेळणाऱ्या ५८ जणांवर गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे चंदगड पोलीस खडबडून जागे झाले आहेत.
या कारवाईमध्ये राजू मसणू सरोळकर रा. शिरगाव, सुनिल शहाजी माने, इनायत उस्मान मुल्ला, सुरेश जग्गनाथ संकपाळ तिघेही रा. चंदगड, पुंडलिक सटूप्पा सावंत रा. हलकर्णी, भारत मास्तमर्डी, बाळू तहसीलदार, संदीप बोळेंद्रे, स्वप्नील घोडके, बाळू सुतार व संतोष मेणसे यांच्यासह बेळगाव, खानापूर अशा विविध ठिकाणांवरील ५८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई शुक्रवारी रात्री कोल्हापूर विभाग स्थानिक गुन्हे अन्वेषणने शिनोळी-देवरवाडी रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
त्यामध्ये रोख रक्कम १ लाख २० हजार, साडे पाच लाखांचे ५५ मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई सहाय्य्क पो. नि.चेतन मसुटगे यांच्या नेतृत्वाखाली पो. हे. कॉन्स्टेबल दिपक घोरपडे,रामचंद्र कोळी,सागर चौगले,सतीश जंगम,वसंत पिंगळे,महेश आंबी,समीर कांबळे,राजू कांबळे,यशवंत कुंभार,यांनी केली आहे.

ऍड. मळवीकर यांच्या प्रयत्नांना यश

काही दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऍड. संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला होता. तरीही चंदगड पोलिसांकडून कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे चंदगड पोलीस यांना याबाबत कोणतीच कल्पना न्हवती का? असा संतप्त सवाल नागरिकांतून ऐकावयास मिळतं आहे. तर चंदगड व पाटणे फाट्यावर सुरु असलेल्या जुगार व मटक्यावर चंदगड पोलीसांकडून कारवाई होणार का?अशी विचारणा होतं आहे.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube