चंदगड /प्रतिनिधी
चंदगड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवाजीराव पाटील
निवडून येणे हि काळाची गरज आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्तितीत शिवाजीराव पाटील यांना आमदार करणारचं तर शिवाजीरावांची उमेदवारी हि चंदगड मतदार संघाच्या विकासासाठी असे अहवाहन माजी राज्यमंत्री भरमु पाटील यांनी केले.
ते सावर्डे ता. चंदगड येथे जाहीर विराट सभेत बोलत होते.
तत्पूर्वी शिवाजीराव पाटील यांनी चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय ते चंदगड बाझार पेठेतुन मिरवणूक काढत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर सावर्डे येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले मागील पराभवाला खचून न जाता मी मतदार संघात काम केले. गेल्या निवडणुकीत चंदगड तालुक्यात १७ हजार मतांचे मताधिक्य होते. तरीही थोडक्या मताने पराभूत झालो.कुणालाही दोष दिला नाही. त्यानंतर पाच वर्षे पायाला भिंगरी बांधून मतदार संघाचा विकास केला. त्याच जोरावर हि निवडणूक लढवत आहे. त्यामुळे चंदगड मतदार संघाच्या विकासासाठी साथ द्या असे भावनिक अहवान शिवाजीराव पाटील यांनी केले.मी कुणावर टीका करणार नाही. कारण माझी हि लढाई मतदार संघाच्या विकासासाठी असेल असं हि पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी एन. टी. नावलाज, शिवाजी चौगले दिग्विजय देसाई, मोहन चव्हाण, संभाजी सरदेसाई, जयवंत चांदेकर, केरबा पाटील,मायाप्पा पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिन बल्लाळ शांताराम पाटील, लक्ष्मण पाटील,यशवंत सोनार, नामदेव कांबळे, नामदेव पाटील, रवी बांदिवडेकर आदी उपस्थित होते.