कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही – मानसिंग खोराटे

चंदगड येथे भव्य मेळावा,शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

चंदगड /प्रतिनिधी
मानसिंग खोराटे निवडणुकीच्या रिंगनातून माघार घेणार, अश्या व्हलग्ना काही लोक करत आहेत.
पण माझं व्हिजन मी निश्चित केलं आहे. जे करतो ते प्लॅनबद्ध असतं.त्यामुळे मी पूर्ण ताकतीनिशी चंदगड विधानसभा लढवून जिंकणार आहे.धमक्या,दबावाला बळी पडून माघार घेणारा मानसिंग खोराटे नाही.असे प्रतिपादन खोराटे यांनी चंदगड येथे उमेदवारी दरम्यान आयोजित सभेत व्यक्त केले.
हलकर्णी ते चंदगड अशी दुचाकी -चारचाकी हजारो वाहनांच्या ताफ्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
खोराटे पुढे म्हणाले माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर आहे.तो प्रवास संपला. आता मला समाज्यासाठी काय तरी करायचं आहे.समाज सुखी करायचा आहे.मतदार संघाला आसलेला मागासलेपणाचा शिक्का पुसून काढायचा आहे. आणि चंदगड मतदार संघ पुढरलेला म्हणून नावारूपाला आणायचा आहे. मला मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे.त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे सांगितले.
काही दिवसात चिन्ह मिळेल. त्यानंतर आपण म्हणजे उमेदवार म्हणून कामाला लागा. आपला विजय निश्चित आसल्याची खात्री यावेळी दिली.
तर आम. राजेश पाटील यांनी जिल्हा बँक गोकुळ मध्ये केवळ सत्ता भोगली. त्याचा समाज्याला उपयोग झाला नाही.
१६०० कोटींचा विकास केला म्हणणाऱ्या राजेश पाटील यांना कै. नरशिंगराव पाटील यांचं साधं स्मारक बांधता आलं नाही. रस्तावरील खड्डे मुजवता आले नाही. मग कुठला केला विकास? असा आरोप
ऍड. संतोष मळवीकर यांनी आम. पाटील यांच्यावर केला.
यावेळी जगन्नाथ हुलजी,बी . एम.पाटील,राजवर्धन शिंदे, बसवराज अरबोळे,संजय पाटील,रंजना कांबळे, विश्वनाथ पाटील आदिसह मतदार संघातील विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपास्थित होते. आभार अश्रू लाड यांनी मानले.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube