चंदगड : चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २६ जणांनी अर्ज दाखल केले होते.
यामध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी महायुती कडून , जनसुराज्य शक्ती पक्ष मानसिंग खोराटे, तर महाविकास आघाडी कडून डॉ. नंदिनी बाभुळकर, शिवाजीराव पाटील,विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी बंडखोरी करत शक्ती प्रदर्शनाने अपक्ष अर्ज दाखल केले होते.
बुधवारी झालेल्या छाननीत एकूण सात अर्ज अवैध ठरले असून २५ अर्ज वैध ठरले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गट आमदार राजेश पाटील, शरदचंद्र पवार गट डॉ. नंदिनी बाभूळकर, जनसुराज्य शक्ती मानसिंग खोराटे, अपक्ष शिवाजी पाटील, गोपाळराव पाटील, अप्पी पाटील या दिग्गजांसह २५ अर्ज वैध ठरलं.
तर माजी आमदार संध्यादेवी कुपेकर दोन, विलास शंकर नाईक, राजेश रघुनाथ पाटील, सुष्मिता राजेश पाटील तीन असे एकूण ७ अर्ज अवैध ठरले होते.