चंदगड पोलिसांकडून पंधरा लाख किंमतीचे गोमांस जप्त

चंदगड : तिलारी -गोवा रोडवरील कोदाळी हद्दीतील घाटात गोवा येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना दहा टन म्हणजे अंदाजे पंधरा लाख किंमतीचे गाय, बैल व म्हैशीचे मांस चंदगड पोलिसांनी जप्त केले.याबाबत पो.उप.नि.आकाश भिंगारदिवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
हि कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.
यामध्ये सय्यदइस्माईल सय्यद अल्लाउद्दीन मिरचोनी रा. पेडामोल शिरवाय केपेम गोवा व अमोल विद्याधर मोहनदास रा.सह्याद्री नगर बेळगांव यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर टाटा कंपनीचा ट्रक व सुझुकी कंपनीची कार असा सव्वीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत पुढील तपास पोसई. श्रीमती शितल धविले करत आहेत.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube