शिवाजी पाटील यांनी दिवाळीनिमित्त केले अभिवादन
चंदगड /प्रतिनिधी
साधू संत येती घरा त्याची दिवाळी दसरा… अशा या साधू-संत आणि शूरवीरांच्या प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी येथील स्मारक स्थळी पहिला दिवा लावून शिवाजीराव पाटील यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी स्मारक स्थळावर दिवे लावून आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या दिपोस्तव सोहळ्याला अनेक शिवभक्त उपस्थित होते.
– गडकिल्ले, पर्यटनविकास, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती करणार*
छत्रपती शिवरायांचे स्वामिनिष्ठ सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांनी नेसारीच्या खिंडीत स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्या पावन भूमीत पाहिलं वंदन करून शिवाजीराव पाटील यांनी दिवाळीचा पहिला दिवा लावला. शिवरायांच्या आशीर्वादाने चंदगड मतदारसंघाची निवडणुकीला सामोरे जाताना प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट देवून दीपोस्तव साजरा केला. यावेळी अनेक शिवभक्त, कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. शिवरायांचा जयघोष आणि दिव्यांचा प्रकाशाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. यावेळी मतदारसंघातली शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले, स्मारक यांचा विकास करून, माताभगिनी, युवकयुवती यांच्यासाठी रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात प्रामाणिक काम करून सर्वांगीण विकासचं स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवाजीराव पाटील यांनी दिली.