एक वेळ जपा आयुष्यभर जपतो

शिवाजीराव पाटील यांची महिलांसह मतदारांना भावनिक साद

वरगाव, गुडेवाडी, नाईकवाडा बागिलगे गावात संवाद दौऱ्याला मोठा प्रतिसाद

चंदगड : गेल्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून हताश होऊन थांबलो नाही. पण त्यानंतर तुमचा विश्वास ही माझी जबाबदारी समजून कोराना, महापुरात मी पदरमोड करून तुमच्यासाठी आधी काम केलंय. आणि त्यानंतरही सातत्याने तुमच्या सेवेत अविरतपणे कार्यरत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी माझ्या घरचे दरवाजे सदैव उघडे असून फक्त एकवेळ तुमचा मतरुपी आशीर्वाद द्या, एक वेळ जपा आयुष्यभर तुमचा विश्वास जपेन असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी दिला.
ते गुडेवाडी, वरगाव, बागीलगे, रामपूर, मलगड येथे संवाद दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले तुम्ही दिलेल्या संधीचे सोने करून चंदगडचा कायापालट करून दाखवतो.
तर गेल्यावेळी थोडक्या मतांनी पराभूत झालो.पण आता कोणत्याही परिस्थितीत आमदार होणार तुम्ही त्याचे साक्षीदार व्हावा.
असे अहवान शिवाजी पाटील यांनी केले.
तर परमेश्वराने भरभरून दिलं आहे. आता इतर कशाचीही अपेक्षा नाही. त्यामुळे आता काही नाही फक्त तुमचीच सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. आतापर्यंत पदरमोड करून माझं काम सुरूच आहे. पण याला संविधानिक पदाची जोड मिळाल्यास शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन विकासातून चंदगडचा सर्वांगीण विकास करणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की शिवाजी जे बोलतो ते तो करतोच त्यामुळे फक्त आणखीन एकवेळ माझ्यासाठी थोडं अधिक राबा, जेणेकरून तुमचे मत सार्थकी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
तुम्ही सुज्ञ आहात. कामाचा माणूस कोण आहे. आणि चोवीस तास तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कोण काम करतं. हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे तुमच्या या भावाला फक्त एकदा सांभाळा आयुष्यभर मी तुमचा सांभाळ करण्यास कटीबद्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.

माझी विकासाची संकल्पना वेगळी असून रस्ते, गटारीच्या पलिकडे जाऊन रोजगार, पर्यटन विकासाच्या माध्यमातून लंगोटीतील माझ्या शेतकऱ्याला नेटाने उभं करणे हे माझं ध्येय आहे. त्यामुळे तुम्ही साथ दिल्यास अधिक जोमाने करणार असल्याचे पाटील यांनी संवाद दौऱ्या दरम्यान सांगितले.यावेळी विविध गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube