अपक्ष उमेदवार आप्पी पाटील यांची कार्वे येथे प्रचार सभा
चंदगड /प्रतिनिधी
मतदार संघात काँग्रेस पक्षाची ताकत असताना, उमेदवाराच्या नावाला विरोध असताना आणि आम्ही बदल उमेदवार मागितल्या नंतर हि उमेदवार लादल्याने आणि घराणेशाहीला विरोध म्हणून आमची उमेदवारी घटक पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून जाहीर केली आहे.
चंदगड तालुक्यातून गोपाळराव पाटील, प्रभाकर खांडेकर, नितीन पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांच्या रूपाने मला मोठी ताकत मिळाली असल्याने माझा विजय निश्चित झाला आहे असल्याचे मत अपक्ष उमेदवार आप्पी पाटील यांनी व्यक्त केले.
ते कार्वे येथे आयोजित प्रचार मेळाव्यात बोलत होते.अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील उपस्थित होते.प्रास्ताविक कॉम्रेड संपत देसाई यांनी करून बंडखोरी का केली याविषयी विश्लेषण केले.
ए.व्ही.एच आणला कुणी?
चंदगड तालुक्यातून ए. व्ही. एच. घालवला , चंदगड तालुक्याचे आम्ही कल्याण केले म्हणणाऱ्यांना विचारा ए. व्ही. एच. आणला कुणी? आता ते अमिष दाखवून आमचा गट फोडण्याऱ्या लाभार्त्यांना बळी पडू नका आम्ही आमची ताकत आप्पी पाटील यांच्या सोबत जोडली आहे. या वेळी आप्पी पाटील विजयाचा गुलाल उधळणार तुम्ही त्याचे साक्षीदार व्हा असे मत गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले.
तर महाविकास आघाडीने आम्हाला उमेदवारी दिली नाही हि त्यांची चूक झाली असल्याची खंत बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते नितीन पाटील यांनी व्यक्त केली. तर आप्पी पाटील यांना चंदगड तालुक्यातून उच्चांकी मत देऊ असा विश्वास प्रभाकर खांडेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पी. डी. पाटील, गोविंददादा पाटील,संजय तरडेकर, अश्विन पाटील आदीनी मनोगत व्यक्त केले. तर यावेळी मतदार संघात सांगली पॅटर्न राबवून आप्पी पाटील यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.