गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांचा अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा
चंदगड :प्रतिनिधी
घराणेशाही थांबावी आणि एका कार्यकर्त्यांला संधी मिळावी यासाठी ही निवडणूक आहे. आज मिळत असणारे पाठिंबे त्याची ग्वाही देतात. हा पाठिंबा विजयाचा गुलाल लावणारा पाठिंबा असेल असा विश्वास अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.
नेसरी गावच्या सरपंच गिरिजादेवी संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या पाठिंब्यामुळे नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात मोठं पाठबळ त्यांना मिळालं आहे.
यावेळी स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संग्रामसिंह नेसरीकर, विलास नाईक, विनायक कोळी, आयुब वाटंगी, कुमार पाटील, वसंतराव दवेकर, अजित नांदवडेकर, सिकंदर मुल्ला, विलास पाटील, अजित तुरटे, राजेंद्र नाईक, एम. आर. पाटील, अशोक कांबळे, रवींद्र देसाई, लक्ष्मण खराडे, दत्तात्रय पाटील, मजीद वाटंगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. तुमचा निर्णय सार्थ करून दाखवतो. आजचा सरपंच पाठिंबा हा नेसरी परिसरातील विकासाचा आहे. या मायमाऊली आणि सैनिकांच्या पाठिंब्यावर आपण सर्वाधिक मताधिक्याने होईल असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.
– शिवजीभाऊ यांच्या व्हिजन आणि कामाला बिनशर्त पाठिंबा
शिवाजीराव पाटील यांच्याकडे मतदारसंघासाठी व्हिजन आहे, ते आमच्या समविचारी असल्याने आम्ही एकमताने त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आजतागायत खूप मदत केली आहे. आम्ही नेसरी ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर कुणीही निधी द्यायला तयार नव्हते. पण, शिवाजीभाऊ यांनी मात्र, कोणतीही आडकाठी न करता मदत केली. त्यांची काम करण्याची तळमळ पाहता ते नक्कीच विजयी होतील यात शंका नाही अशी अशा गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांनी व्यक्त केली.
दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत त्यांची यंत्रणा असून त्यांची प्रशासनावरील पकड पाहता आपल्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही याची ग्वाही गिरिजा देवी शिंदे-नेसरिकडे यांनी दिली. तसेच आजपासूनच आपण सर्वांनी कामाला लागुयात आणि प्रचंड मतांनी त्यांना निवडून देऊयात असं आवाहन त्यांनी केले.