शिवाजीराव पाटील यांच्यावर वरुणराजाची कृपादृष्टी; किणी येथे प्रचारसभे दरम्यान पाऊस
चंदगड :
आजरा भागातील कीणी परिसरात शिवाजीराव पाटील यांची सैनिक, तरुणाईने प्रचार रॅली काढली. त्यानंतर झालेल्या सभेवेळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यावेळी भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकांवर बरसल्याचे दिसून आले. त्यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी केलेली कामे आणि सातत्याने लोकांमध्ये राहून घेतलेले कष्ट याचा दाखला दिला. तरीदेखील होत असलेल्या टीकेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी झालेल्या वरुणराजाच्या आगमनाला शुभ संकेत मानून आपण पुढे वाटचाल करत आहोत. पावसात भिजलं की सभा पण गाजते आणि विजय पण निश्चित होतो. त्यामुळे कुणीही मागे बघायची गरज नाही, विजय पक्का असून गुलाल आपलाच आहे, असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी यावेळी दिला.
यावेळी अशोक चराटी, जयवंत सुतार, अनिरुद्ध केसरकर, यांचेसह कार्यकर्ते, सैनिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भर पावसात विरोधकांवर बरसले
विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी सैनिक आणि तरुणांची हलकर्णी विभागात बाईक रॅली काढून प्रचार केला. दरम्यान, सायंकाळी झालेल्या पराचार सभेत शिवाजीराव पाटील यांचे भाषण सुरू होताच पाऊस सुरू झाला. त्यावेळी भर पावसात शिवाजीराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर बरसले. केवळ घराणेशाही आणि राजकीय वारसा घेऊन पुढे आलेल्यांना सर्वसामान्य जनतेचं दुःख कसं दिसणार असा सवाल करून एका शेतकरी कुटुंबातील तुमच्या उमेदवाराला साथ द्या असे आवाहन केले.
शिवाजीराव पाटील यांनी आतापर्यंत सत्ता नसताना, कोणतेही सांविधनिक पद नसताना केलेली विकासकामे, गेल्या पाच वर्षात सातत्याने लोकांमध्ये राहून सुख दुःखात सहभागी झाले, माता भगिनी, जवान, किसन यांच्या पाठीशी राहून साथ दिली. आता जनतेने त्यांना साथ देण्याची वेळ आली आहे. त्यांना लोकांनी साथ देऊन त्यांच्या कामाला प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या कामाची पोच पावती द्यावी आणि प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं आवाहन भरमूअण्णा पाटील यांनी केले.