कार्वे येथे राजेश पाटील यांचा संवाद
चंदगड :
मजरे कारवे गावात दीड कोटींचा विकास निधी दिल्याबद्दल कारवे वाशियानी आमदार राजेश पाटील यांचा जाहीर सत्कार केला. याचवेळी अक्षतारुपी पाऊस बरसला. भावाच्या प्रेमाखातर बहिणींनी धो – धो पाऊस अंगावर झेलत भाषणाला दाद दिली. शेवटी आमदार पाटील यांनीच भाषण आटोपते घेतले.
भर पावसामध्ये तुम्ही या सभेला जमला हे दृश्य पाहून माझा ऊर भरून आला आहे. निश्चितपणे तुम्ही दाखवलेल्या प्रेमाचा,आपुलकीचे ऋण येत्या काळामध्ये विकासकामांच्या माध्यमातून फेडेन.केलेल्या कार्याच्या जोरावरती तुम्ही मला पुन्हा एकदा संधी द्या. येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. यावेळी, संग्रामसिंह कुपेकर, मारूती बेनके, तानाजी गडकरी, पांडुरंग बनके, मारुती हजगुळकर, नरसिंग बोकडे सर, तानाजी तुपारे, शिवाजी सुतार, शरद पाटील, नंदिनी बेनके, तेजस्विनी गडकरी, रेणुका बोकडे, रेशमा बोकडे, म्हातारु वेसने, अशोक बोकडे, सुजाता कांबळे, ज्योती कांबळे, किशोर बोकडे, सुधीर मांजरेकर, शशिकांत परिट, प्रल्हाद गडकरी, नामदेव बेनके,संभाजी बोकडे, सुरज हारकारे, रामचंद्र हारकारे, विजय वेसने, परशराम वेसने, मधुकर बोकडे, सुभाष हजगूळकर, सागर तुपारे, नारायण तुपारे, आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचालन सागर बोकडे यांनी केले. आभार एस. आर.पाटील यांनी मानले.