पोवाचीवाडी ग्रामस्थाचा शिवाजी पाटील यांना पाठिंबा

चंदगड :
पोवाचीवाडी ता. चंदगड येथील ग्रामस्थानी सावर्डे येथे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या कार्यालयाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. कर्तुत्वावर उभा राहिलेलं नेतृत्व म्हणजे शिवाजीभाऊ जसजसे मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे महिला व युवकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
दरदिवस चंदगड,आजरा, गडहिंग्लज मधून वाढता पाठिंबा पहावयास मिळत आहे.
समाज करणातून स्व कर्तुत्वावर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे शिवाजीराव पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
गेल्या पाच वर्षात त्यांनी जनतेसाठी केलेले काम आणि त्यांची मतदार संघाच्या विकासासाठी असलेली तळमळ पाहून
शनिवारी कानडी ग्रामपंचायत मधील पोवाचीवाडी गावच्या नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी अरुण मातवंडकर, भगवंत नातवंडकर, उमेश सुतार, राजेश सुतार, उत्तम कोंडुसकर ,सागर सुतार, ज्ञानेश्वर यादव, अमोल चोपडे ,परसराम बेलेकर ,रामा नारळकर ,अमर यादव, रवी देवळी, प्रकाश कडोलकर, जयसिंग नारळकर, व महिलांमध्ये सुशीला बेलेकर, कांचना बेलेकर, पायल बेलेकर, गीता बेलेकर, शुभांगी मातवंडकर, भाग्यश्री यादव, सुनिता नारळकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

You cannot copy content of this page

Facebook
YouTube