चंदगड : छापा टाकून चंदगड पोलिसांनी मंगळवारी आमरोळी येथील गोठ्यात साठा केलेली २ लाख ७० हजार किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी सचिन हुवाप्पा नाईक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आमरोळी येथील एका घराजवळ गोठ्यात विनापरवाना गोवा बनावटीची दारू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शितल धविले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी रात्री उशिरा सचिन यांच्या गोठ्यात छापा टाकला. त्यामध्ये २ लाख ७० हजार किमतीची गोवा बनावटीची दारू आढळली. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेत सचिनला ताब्यात घेतले आहे.