चंदगडची आमसभा घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू -ऍड. मळवीकर

चंदगड /प्रतिनिधी
चंदगड मतदार संघात आरोग्य, रस्ते, शिक्षण व पाणी या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आसताना आम. राजेश पाटील सोळाशे कोटीच्या विकासकामांचा डांगोरा पिटत आहेत. इतक्या समस्या असताना आमदारांनी नेमका कसला विकास साधला हे जनतेला सांगण्यासाठी आमसभा बोलावावी आणि जनतेच्या मनातील खदखद ऐकून घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा ईशारा ऍड. संतोष मळवीकर यांनी आम. राजेश पाटील यांना दिला. ते हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, आनंद हळदणकर यांनी हि तालुक्याच्या व्यथा मांडल्या.
मळवीकर पुढे म्हणाले चंदगड तालुक्यात शासकीय कार्यालयात होणारी जनतेची हेळसांड थांबवायची असेल तर पोलीस ठाणे, एस. टी. आगार, वन विभाग या कार्यालयात लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना भुर्दंड बसत आहे. त्यासाठी गुरुवारी चंदगड तहसीलदार यांना निवेदन देणार असून त्यातूनही मार्ग न निघाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असे सांगितले. तर मानसिग खोराटे हे तुडये परिसरात गेले असता लोकांनीच पाण्याचा प्रश्न खोराटे यांच्यापुढे मांडला. कित्येक वर्षे तेथील लोकं पाण्याच्या झळा सहन करत आहेत. पण आमदारांना राकसकोप धरणातील अडवलेल पाणी दिसलं नाही. त्याविषयी तिथल्या लोकांच्या भावना जाणून घ्याव्याश्या वाटल्या नाहीत. राजकारण डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यांना पाणी पुसायचं काम आमदार करत असल्याचे जगन्नाथ हुलजी यांनी सांगितले.
यावेळी उदय पाटील,शशिकांत रेडेकर, सुनील नाडगौडा, विश्वनाथ ओऊळकर, अश्रू लाड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube