शिनोळी येथे मानसिंग खोराटे यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा
चंदगड /प्रतिनिधी
तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी हे चंदगड तालुक्यातील आठ गावांसह सिमा भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. यावर यापूर्वीच तसा सर्वे झाला आहे. त्यामुळे राजेश पाटील यांची भूमिका हि शेतकऱ्यांच्या हिताची असून कोणतीच माहिती न घेता एखाद्यावर टीका करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे दौलत-अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केलेल्या वक्तावायचा संबंधित गरमस्थानी शिनोळी येथे जाहिर निषेध व्यक्त केला. यावेळी तुडये, सरोळी, सुरुते, शिनोळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर म्हणाले मार्कंडेय नदीच्या पाण्याचा उपयोग हा चंदगड तालुक्यातील आठ -दहा गावं आणि बेळगांव सिमा भागातील २२ गावांना होणार आहे. आणि बेळगावला चंदगड पासुन वेगळं समजणाऱ्या खोराटे
यांना कारखान्याला ऊस चालतो मग कर्नाटकच्या शेतकऱ्यांना पान्यासाठी विरोध का? असा सवाल उपस्थित केला.हा पाणी प्रश्न राजकीय नसून जिव्हाळ्याचा आहे असे सांगितले. या पाण्याला विरोध करण्यासाठी शंभर शेतकरी आले तरी हा लढा चालूच राहील असे मत मार्कंडेय शेतकरी संघटनेचे नेते नारायण पाटील यांनी व्यक्त केले. तर तुम्ही भाडेकरू आहात आणि मालकाला समजत भाडेकरूला केव्हा घर खाली करायचं असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
हा लढा कित्येक वर्षाचा आहे आणि राजेश पाटील अपघाती आमदार नाही तर त्यांच्या पाठीमागे कैलासवाशी मंडलिक, नरशिंगराव पाटील, बाबासाहेब कुप्पेकर यांच्या विचारांचा वारसा आहे असे जानबा चौगले यांनी सांगितले.
यावेळी, मारुती पाटील, बंडू चि गरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी गावडे , विलास सुतार , गणपत कांबळे ,
राजू जाधव,एस. वाय पाटील, परशराम पाटील,चंद्रकांत पाटील,गोपाळ भोगन, नारायण पाटील, इराप्पा पाटील, आर. बी. पाटील, , सुरेश पाटील, तुकाराम पाटील, अशोक कदम, एस. वाय. पाटील, पांडुरंग बेनके, , अरुण सुतार,उत्तम चांदेकर नामदेव बोकमूरकर,आदी उपस्थित होते.