शिवाजीराव पाटील यांची सावर्डे येथे पत्रकार परिषदेत माहिती
चंदगड / प्रतिनिधी
पराभवा नंतर मतदार संघात असलेला संपर्क आणि आमदार नसतानाही ८७ कोटी आणलेला विकासनिधी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीर या माध्यमातून वाढलेली ताकत पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने केवळ राजकीय बदनामीसाठी मी भाजपा पक्ष सोडल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ह्या पूर्ण अफवा आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसचं माझ्या भविष्याचा निर्णय घेतील. मला राजकारणात आणून मोठं केलं त्या भाजप पक्षाला कितीही ईतर पक्षांच्या ऑफर आल्या तरी मी भाजपा सोडणार नाही. तुतारी हाती घेणार नाही. अशी माहिती भाजपा चंदगड निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी दिली ते सावर्डे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंदगड मतदार संघात शिवाजीराव पाटील तुतारी फुंकणार अशी चर्चा सोमवारी होती. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली.
पाटील पुढे म्हणाले गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायत दूध, सेवा संस्था व इतर निवडणुकीच्या सत्तेच्या माध्यमातून भाजपा व शिवाजी पाटील यांची ताकत वाढली आहे. माजी राज्यमंत्री भरमुआण्णा हे माझ्या वडिलांप्रमाणे सोबत आहेत. त्यामुळे कोणी किती वावड्या उठऊ दे मी राजकारणासाठी नाही. समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासा बरोबर मतदार संघात पन्नास हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या पाठीशी आशिर्वाद आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चंदगड मतदार संघाचा आमदार हा भाजपचा असेल अशी हि त्यांनी ग्वाही दिली. यावेळी नामदेव पाटील, शांताराम पाटील, सुनील काणेकर, अनिल शिवणगेकर,रवी बांदिवडेकर, के. आर. देसाई आदी उपस्थित होते.
फडणवीस माझे दैवत
विद्यमान आमदाराणप्रमाणे मी उमेदवारीसाठी एक फोटो आणि निवडून आल्यावर एक फोटो वापरणार नाही, देवदूत म्हणून आलेल्या ताई कोरोना काळात कुठं होत्या? कुकर वाटणारे कुणाची शिट्टी वाजवणार माहिती नाही. असं हि ते आम. राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, अप्पी पाटील यांचं नाव न घेता म्हणाले तर माझ्या राजकीय प्रवासात देवेंद्र फडणवीस हेचं माझे दैवत असतील आणि कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.