भरधाव वेगामुळे चंदगड -आंबोली पर्यटन ठरतंय जीवघेण

चंदगड /विलास कागणकर 
पावसाळा लांबाला असला तरी मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात वळवाच्या पाऊसाने हजेरी लावल्याने चंदगड -आंबोली परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला असून पर्यटकाची वर्दळ वाढली आहे. पण बेळगांव सिमा भागातून सुसाट वेगाने येणाऱ्या पर्यंटकांमुळे पर्यटन जीवघेण ठरत आहे.
चंदगड तालुक्यातील तिलारी, स्वप्नवेल, रातोबा पॉईंट, जंगमहट्टी, किटवाड धरण, अडक्याचा धबधबा, महीपाळगड, सवतीचा ओझर व अन्य पर्यंटन स्थलांवर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळतं आहे. शनिवार व रविवार हे दिवस मुख्य पर्यटनाचे दिवस ठरत आहेत.या दिवशी सिमा भागातून सकाळी पहाटे पासुन बेळगांव,चंदगड -वेंगुर्ला मार्गांवर दुचाकी चार चाकी वाह्नांची वर्दल वाढली आहे. एकमेकांच्या इरषेवर वाहने पळवली जात आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून गेल्या दोन वर्षात पर्यंत्नासाठी येणाऱ्या पर्यटकांना आपल्या हुल्लडबाज प्रकारामुळे जीवाला मुकावे लागले आहे. तर स्थानिक नागरिकांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहणांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांना चंदगडचे पर्यटन हे जीवावर बेतणारे ठरत आहे.

चौकट :
शिस्त हवी पण लावणार कोण?
चंदगड तालुक्यातील धरण, तलाव या ठिकाणी ना सुरक्षा रक्षक ना पाठबंधारे विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे धरण,तलाव यांची सुरक्षा राम भरोसे आहे. तर चंदगड पोलीस ठाण्याकडून पर्यटकांना वेगावर नियंत्रण आणण्यासाठी कोणताच पुढाकार नाही. तर तहसील, वन विभागाकडून याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं असल्याने, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यांकडे दुर्लक्ष असल्याने बेदारकरपणे हुल्लड बाजी करणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावणार कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

You cannot copy content of this page

Facebook
YouTube