चंदगड नगरपंचायतच्या वतीने विविध उपक्रम

चंदगड /प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान २.० नागरी अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधी मध्ये स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छ – संस्कार स्वच्छता हि संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले होते. या अभियांनातर्गत चंदगड – नगरपंचायत च्या मुख्याधिकारी श्रीमती. शिल्पाराणी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता यात्रा, श्रमदान मोहीम. स्वच्छता शिबीर, सफाई कर्मचारी यांना विविध योजनेचे लाभ मिळवून देणे, शाळा स्तरावर जास्ती-जास्त उपक्रम घेणे, वृक्षारोपण करणे, कापडी पिशवी वाटप करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात १७ सप्टेबर रोजी छ. संभाजी महाराज चौक या ठिकाणची स्वच्छता करून झाली. तसेच १ ऑक्टोबर रोजी शाळा स्तरावर टाकावू पासून टिकावू या स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन देव रवळनाथ हॉल या ठिकाणी भरवण्यात आले होते. तर २ ऑक्टोबर रोजी चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले. यानंतर चंदगड शहरातून स्वच्छयात्रा काढण्यात आली. यावेळी कन्या शाळेच्या विद्यार्थिनीनी छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शून्य कचरा व्यवस्थापन या वर आधारित पथ नाट्य सादर केले. स्वच्छयात्रा दरम्यान विनायक नगर येथील स्वच्छता करन्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, विरोधी पक्ष नेते दिलीप चंदगडकर, नगरसेविका अनुसया दानी, अनिता परिट, माधुरी कुंभार, संजना कोकरेकर, नूरजहाँन नायकवाडी, शिवानंद हुंबरवाडी, विजय कडूकर तसेच नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube