चंदगड येथे जय जवान जय किसान मेळाव्यात सैनिक, शेतकऱ्यांचा सन्मान
चंदगड /प्रतिनिधी
ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले, सेवा केली त्यांचा गौरव शिवाजीराव पाटलांनी केला. देशाची सिमा सैनिक सांभाळतात आणि शेतीचे रक्षण शेतकरी करतात म्हणून देश आबादित आहे. हा सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे . शिवाजी पाटलांची लोकप्रियत्ता आणि लोकांविषयीची तळमळ उपस्थित जन समुदयावरून दिसून येते. भाजपाला असा लोकप्रतिनिधी लाभला हे आमच भाग्य असून आम्ही व फडणवीस साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू शिवाजीराव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी ग्वाही केंद्रीय सहकार व विमान वाहतूक उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ते चंदगड येथे शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या जय जवान जय किसान मेळाव्यात बोलत होते. यावेळी शहिद जवान कुठूबिय, आजी -माजी सैनिक व शेतकऱ्यांच्या सन्मान करण्यात आला. तर शिवाजीराव पाटील मागील विधानसभेला थोडक्या मतांनी पराभूत झाले . पण यावेळी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्वप्न देवेंद्र फडणीस यांचे आहे.त्यासाठी आपण हि त्यांच्या सोबत राहू अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तर संसदरत्न खासदार धनंजय महाडिक म्हणाले जागा उपलब्ध करून द्या सैनिक भवन उभारू तसेच चंदगड मतदार संघांसाठी उद्योग यावे यासाठी प्रयत्न करू असे सांगून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या असे अहवान करुन उपस्थितांचे आशीर्वाद शिवाजी पाटलांना यशाच्या शिखरापर्यंत पोहचवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर पराभवा नंतर खचून न जाता काम सुरु ठेऊन हेरे सरंजाम प्रश्न मार्गी लावला सत्याएंशी कोटी निधी . मतदार संघात आणला. गडकिल्यांच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न सुरु आहेत. मतदार संघांसाठी विकासात्मक स्वप्न पाहिलेत. विकास काय आहे हे जनतेला दाखवुन द्यायचं आहे. मतदार संघात सैनिक स्कुल, नर्शीग कॉलेज हॉस्पिटलसह दहा नामांकीत कंपन्या आणण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी मंत्री मोहोळ यांच्याकडे करून शिवाजी पाटील जे बोलतो ते करतो असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील म्हणाले शेतकरी व सैनिक हेचं देशाचे रक्षणकरते आहेत. त्यांचा विकास म्हणजे खरं विकासात्मक काम हेचं काम यापुढे हि करायचं आहे. तालुक्यात शेतकऱ्यांचा कारखाना राहिला नाही आणि चंदगड -बेळगांव महामार्ग झाला नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी जिल्हा अध्यक्षा अनिता चौगले, हभप विठ्ठल फड महाराज, नुल मटाचे भगवान गिरी महाराज, युवा अध्यक्ष एल. टी. नवलाज,जयवंत चांदेकर, कुमार बसगोंडा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संग्राम कुपेकर,पारुताई नाईक,शांताराम पाटील, लक्ष्मण पाटील,ज्योती पाटील, मनीषा शिवणगेकर,दिपक पाटील,जयश्री तेली, नामदेव पाटील, रवी बांदीवडेकर,भावकु गुरव, सचिन बल्लाळ,भारती जाधव, यशवंत सोनार, सुनील काणेकर,मायाप्पा पाटील,ऍड.विजय कडुकर, विशाल बल्लाळ, जाणबा कांबळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन विनया गावडे हिने केले.आभार अनिल शिवणगेकर यांनी मानले.
.