कोवाड /प्रतिनिधी
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे नवरात्र उत्सव व दसरा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा – खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेत महिलांनी उत्सपूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उदघाट्न अनुसया दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये संध्या कांबळे ह्या पैठणीच्या मानकरी. तर उपविजेत्या अनिता पाटील ठरल्या. या वेळी श्रीमंता पाटील, सुशिला पाटील, जनाबाई पाटील, अनुसया पाटील, आनंदी पाटील, शांता पाटील, आंबाका पाटील यांचा समावेश होता. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तळ्यात-मळ्यात, स्ट्रॉ खोप्यात घालणे , फुगे फोडणे, चिमटे लावणे,केळी खाणे, ग्लास मनोरा करणे,फुगे पळवणे, टिकली खेळ, आणि बिस्किट खाणे यांचा समावेश होता. यामध्ये स्वाती पाटील, लता कोकीतकर, मेघा पाटील, संध्या कांबळे, अनिता पाटील, प्रगती पाटील, शालन पाटील आदिसह महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संजय साबळे, रवी पाटील यांनी केले.