आजरा /प्रतिनिधी
राजकारण, निवडणुका येतात जातात त्याचा जास्त विचार न करता गावाच्या विकासासाठी एकजूट महत्वाची असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांनी केले. ते कानोली ता.आजरा येथील अंतर्गत ३० लाख काॅंक्रिट रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच सुषमा पाटील, सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील अनिल पाटील, सारिका भोसले, शुभांगी पाटील, आरती देसाई, दीपाली सुतार, सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, दूध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील,सोसायटी संचालक राजू पाटील, भाऊ भोसले, बळवंत पाटील, शिवाजी पाटील, विजयकुमार पाटील, सुभाष पाटील, सुभाष घाटगे,आनंदा देसाई, सागर पाटील, कॉन्ट्रॅक्टर दिग्विजय भोसले, रोजगार सेवक संतोष भोगण, संतोष पाटील आदी उपस्थित होते.