चंदगड/प्रतिनिधी : गेली सहा वर्षे सातत्याने प्रकाशित होणारा ताम्रकाठ दिवाळी अंक. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या अंकाचे प्रकाशन पार पडले.
कुदनूर गावचे सुपुत्र चंद्रकांत आप्पाजी कोकीतकर संपादित ताम्रकाठ दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला परशुराम चौगुले राजगोळी बु. चंद्रकांत निर्मळकर प्रा.राजेंद्र हदगल , कृष्णा मांडेकर , काडेश हिरेमठ (सिद्धेश्वर स्वामी)
मधुकर आंबेवाडकर, मारुती तळवार, प्रकाश हेब्बाळकर, यल्लाप्पा तळवार, रमेश कुंभार , यांच्या उपस्थित दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी केवळ वाचन संस्कृत्ती वाढावी वाचकांना नवीन काहीतरी आणि नावीन्यपूर्ण वाचायला मिळावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे संपादक चंद्रकांत कोकितकर यांनी सांगितले.
तर मारुती तळवार यांनी ताम्रकाठ दिवाळी अंकास शुभेच्छा देऊन,सर्वानी या अंकास सहकार्य करावे व तो दरवर्षी प्रकाशित व्हावा असं सांगून मान्यवरांचे आभार मानले.