महायुतीत बंडखोरी कायम, शिवाजी पाटील यांची यंत्रणा लागली कामाला
चंदगड :
भाजपचे शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाण्याची टाकी या चिन्हावर ते मैदानात उतरले आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत त्यांनी याच चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी अगदी थोडक्या मतांनी त्यांना विजयने हुलकावणी दिली.
मात्र, यावेळी आपण नक्की विजयाचा गुलाल उधळू असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला आहे .
सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत आपण लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित असून त्यांना पाण्याची टाकी हे चिन्ह मिळालं आहे. मागच्या निवडणुकीतही हेच चिन्ह आल्याचे मतदारसंघात ते पोहचलेले आहे. लोकांना शिवाजी पाटील यांची पाण्याची टाकी परिचित असल्याने त्यांना प्रचार करणे सोपे होणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी यंत्रणा कामाला लावली असून बूथ लेव्हलला काम सुरू केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच वर्षात केलेली कामे, महिला भगिनींची साथ, युवक, शेतकरी, जवान यांच्या पाठबळावर यावेळी नक्की विजय मिळवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून दाखवू असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघात आपली पकड मजबूत केली आहे.त्यामुळे यावेळी नक्की यश येईल यात शंका नाही त्यामुळे गाफिल न राहता कार्यकर्त्यांनी हि निवडणूक जबाबदारीने हाती घेतली असल्याचे हि त्यांनी सांगितले आहे.