चंदगड : पंढरपूरकडे चाललेल्या पायी दिंडीत भरधाव वेगाने येणारी दुचाकी वारीत घुसल्याने मोरेवाडी ता. चंदगड येथील सुमन बाळू पाटील (वय ५०)यांचा रत्नागिरी -नागपूर महामार्गांवर शिरढोण येथील जिल्हा परिषद शाळेसमोर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.तर चार जण जखमी झाले.
हि घटना गुरुवारी दुपारी घडली.
हि दिंडी तीन नोव्हेंबर रोजी रवाना झाली होती.या अपघातात सुमन यांचा पाय निकामी झाला. रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या वारीमध्ये साठ वारकरी सहभागी झाले होते.
या घटनेने मोरेवाडी ग्रामस्थासह परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.