चंदगड : गणेशवाडी-राजगोळी येथे विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने म्हैसी चरण्यास गेलेल्या शिवगोंडा अपांन्ना पाटील ( वय ६७) रा. गणेशवाडी -राजगोळी येथील शेतकरी व एक म्हैस दोन कुत्री मयत झाली.याबाबत बसगोंडा पाटील यांनी चंदगड पोलिसात वर्दी दिली आहे.
याबाबतपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शिवगोंडा पाटील हे राजगोळी हद्दीत असणाऱ्या कल्लाप्पा निंगाप्पा पाटील यांच्या शेतात म्हैसी चारायला गेले होते. यावेळी गणेशवाडी फिडरच्या खांबावरील तार तुटून पडली होती.त्या तारेचा अंदाज न आल्याने शिवगोंडा पाटील व एक म्हैस व दोन कुत्री असे मयत झाले.याबाबत चंदगड पो.हे.कॉ. जमीर मकानदार करीत आहेत.