लाडक्या भावाला निवडून द्या -शिवाजीराव पाटील

मतदार भगिनींना शिवाजीराव पाटील यांची साद
चंदगड :
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रणधुमाळी सुरू आहे, चंदगड मतदार संघातून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चंदगड येथील प्रचार सभेत बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत भावाला निवडून देणे ही ओवाळणी असेल असे मत व्यक्त केले. चंदगड मतदार संघाचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रचाराची रणधुमाळी चंदगड भागातून सुरू केली असून बहिणींचा पाठिंबा आहे म्हणूनच हा भाऊ बहिणीच्या सुखासाठी निवडून येणार आणि कायापालट करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला सिंटेक्सची पाण्याची टाकी‘ या ,चिन्हाखाली यंदाची निवडणूक लढविण्यात येत आहे.
वाहतुकीची सोय, शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी गावातून बसची व्यवस्था आणि रोजगाराची संधी अशा विविध विकासाच्या वाटा समोर ठेवून निवडणूक लढविण्यात येत आहे . बहिणींच्या चेहऱ्यावर हसू आली, विद्यार्थ्यांचा विकास यासाठीच रोजगार मिळावे कारखान्यामधून नोकरीची संधी असा विचार करून पुन्हा एकदा यंदाची निवडणूक लढविली जात आहे यामुळे मागील निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी पाठीमागे होतो. पण यावेळी मात्र पंचवीस हजार मताधिक्याने विजय मिळेल अशा विश्वासाने ही निवडणूक लढवीत असून चंदगड मतदार संघाचा कायापालट हा एकच ध्यास असल्याचे शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी विविध गावात प्रचार पद यात्रा केली यामध्ये कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube