चंदगड /प्रतिनिधी :
गवसे ता. चंदगड येथे छापा टाकून चंदगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ६ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करू दोघांना ताब्यात घेतले.
दशरथ अर्जुन सावंत वय ४८, रा. गवसे, प्रदिप पाटील रा. सावंतवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी हे दोघेही दोन कारमधून गवसे येथे गोवा बनावटीची दारू आणणार असल्याची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी पहाटेच छापा टाकून त्यांच्याकडून ६ लाख ४८० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.