आमदारांनी जनतेचा विश्वासघात केला -आप्पी पाटील

चंदगड :
सोळाशे कोटी निधी आणला असे सांगत टेम्बा मिरवणाऱ्या महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत महायुतीचा पराभव करणारच आणि त्यासाठीच समविचारी लोक एकत्र आलो असून राजर्षी शाहू समविचारी आघाडी निवडून येणार असे राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.
ते विविध गावात प्रचारा दरम्यान बोलत होते.
आप्पी पाटील पुढे म्हणाले ही निवडणूक आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतली असून कोणत्याही परिस्थितीत राज्यात धर्माध आणि जातीयवादी असे महायुतीचे सरकार सत्तेवर येऊ नये यासाठी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणे आणि मतदारसंघाचा मुलभूत विकास हे आमचे उद्दिष्ट आहे.असे सांगितले.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील आजरा गडहिंग्लज आणि चंदगड या तीनही तालुक्यातील जनता सोबत असल्याचे सांगून जनतेच्या विश्वासाच्या बळावरच या निवडणुकीत उतरल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तर ही विचारांची लढाई आहे. एका बाजूला धर्माध, जातीयवादी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्षाचा म्हणजे महायुतीचा, अपक्ष म्हणून आणि कोणतीही वैचारिक भूमिका नसलेला महायुती पुरस्कृत उमेदवार तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे जनतेकडे पाठ फिरवलेले आणि केवळ वारसदार म्हणून मत मागणारे उमेदवार आहेत. असा उमेदवारांचा समाचार घेत राजर्षी शाहू समविचारी आघाडी स्थापना करून जनतेला सक्षम पर्याय दिला असल्याचे अप्पी पाटील यांनी सांगितले.
हा मतदारसंघ नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही अशा रीतीने पर्यटन व्यवसाय कसा विकसित करता येईल यावर आमचा भर रहाणार आहे. त्यातून इथल्या तरुणाईच्या हाताला नवा रोजगार मिळू शकेल. इथे हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी यासारख्या नद्या आहेत. चित्री, उचंगी, फाटकवाडी, जांबरे उमगाव, जंगमहट्टी यासारखे अनेक सिंचन प्रकल्प झाले आहेत. तरीही या मतदारसंघातील ६० टक्केहून अधिक जमिनीचे क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. हे पाणी बंद पाईपने वंचित विभागांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. पाण्यापासून वंचित असलेला भाग सिंचनाखाली येईल. या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधने व शेती उत्पन्नावर बटाटा,रताळे इत्यादीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर भर देणार . पायाभूत सुविधांबरोबरच आरोग्य, शिक्षण या दोन मुदद्यांवर जास्त भर दिला जाईल. सरकारी आरोग्यसेवा सक्षम आणि लोकाभिमुख बनवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी विधानसभेत आवाज उठविला जाईल. वेळ पडल्यास जनआंदोलन उभा केले जाईल. असा आघाडी अजेंडा जाहीर करून यासाठी राजर्षी शाहू समविचारी आघाडीची स्थापना केली असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube